तुम्ही कधी विचार केलाय का की एक ऑटो रिक्षा चालवणारा व्यक्ती महिना लाखोंची कमाई करू शकतो? तुमचं उत्तर जर काही हजार रुपयांपुरतंच मर्यादित असेल, तर आता धक्क्याला तयार राहा! कारण मुंबईतील एका स्मार्ट ऑटो ड्रायव्हरने अशी कमाई सुरू केली आहे की ऐकून तुमचाही विश्वास बसेल नाही – हा व्यक्ती दरमहा तब्बल ₹5 ते ₹8 लाख कमावतो!
अमेरिकन वाणिज्य दूतावासासमोरचा “बिझनेस गुरू”
ही भन्नाट आणि प्रेरणादायक गोष्ट लेंसकार्ट कंपनीचा प्रॉडक्ट लीडर राहुल रुपानी यांनी त्यांच्या LinkedIn पोस्टमध्ये शेअर केली आहे. त्यांनी सांगितलं की, मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावास (US Consulate) समोर रोज उभा असलेला हा ऑटो ड्रायव्हर आपल्या कल्पकतेच्या जोरावर एक वेगळाच व्यवसाय करत आहे – बॅग ठेवण्याची सेवा!
“सर, बॅग द्या… मी सुरक्षित ठेवतो” – ₹1000 ठरलेलं शुल्क
राहुल यांना वीजा अपॉइंटमेंटसाठी US Consulate मध्ये जायचं होतं, पण तिथे बॅग्स नेण्यास सक्त मनाई आहे. लॉकरचीही काही सोय नव्हती. तेव्हा एका ऑटोवाल्याने त्यांना विचारलं –
“सर, बॅग द्या. मी रोज करतो हे. ₹1000 लागतील.”
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही सेवा वापरणाऱ्या प्रत्येकाकडून तो थेट ₹1000 चार्ज करतो.
दररोज 20-30 ग्राहक, महिन्याला लाखोंची कमाई
या सेवेमुळे दररोज 20 ते 30 लोक त्याच्याकडे बॅग ठेवतात. म्हणजेच दिवसाला किमान ₹20,000 ते ₹30,000 इतकी कमाई होते. महिन्याचं गणित लावा – ₹6 लाखांहून जास्त उत्पन्न, तेही एकही किलोमीटर ऑटो न चालवता!
दिवसाला बॅग्स | प्रति बॅग शुल्क | दिवसाची कमाई | महिन्याची कमाई (30 दिवस) |
---|---|---|---|
20 ते 30 | ₹1000 | ₹20,000 – ₹30,000 | ₹6,00,000 – ₹9,00,000 |
कायदेशीर व्यवस्था आणि सुरक्षितता
एका ऑटोमध्ये एवढ्या बॅग्स ठेवणं शक्य नसल्यामुळे, या ड्रायव्हरने जवळच्या पोलीस अधिकाऱ्याशी भागीदारी केली आहे. त्या अधिकाऱ्याकडे सुरक्षित लॉकर स्पेस आहे जिथे सर्व बॅग्स ठेवल्या जातात. ऑटो फक्त बॅग गोळा करण्याचं माध्यम आहे.
ना MBA, ना स्टार्टअप – फक्त अक्कल आणि टायमिंग
राहुल रुपानी यांनी या योजनेला “Street Business Masterclass” असं नाव दिलं आहे. ना स्टार्टअप, ना इन्व्हेस्टमेंट – फक्त संधी ओळखण्याचं कौशल्य, ठिकाणाचं निरीक्षण, आणि व्यावसायिक डोकं.
या ऑटोवाल्याने हे सिद्ध केलंय की यश मिळवण्यासाठी ना डिग्री लागते ना मोठा व्यवसाय प्लॅन – फक्त थोडी कल्पकता, अक्कल आणि कृती आवश्यक आहे!