30 जून 2025 हा “एकीकृत पेंशन योजना (UPS)” स्वीकारण्यासाठीचा अंतिम दिवस आहे. ही योजना राष्ट्रीय पेंशन प्रणाली (NPS) अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित मासिक पेंशनची हमी देते.
महत्वाच्या तारखा:
- अंतिम तारीख: 30 जून 2025
- अंमलबजावणी: 1 एप्रिल 2025
- वेळेत अर्ज न केल्यास NPS ची मूळ अटी लागू
योजनेची ठळक वैशिष्ट्ये:
- ≥25 वर्ष सेवा: निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्यांच्या सरासरी मूलभूत वेतनाचे 50% पेंशन
- 10–24.9 वर्ष सेवा: ₹10,000 निश्चित किमान पेंशन
- Gratuity, सेवानिवृत्ती लाभ: CCS (NPS अंतर्गत Gratuity नियम, 2021) नुसार लागू
पेंशन हमी सारांश:
सेवा कालावधी | हमी दर | किमान रक्कम |
---|---|---|
≥ 25 वर्ष | मूलभूत वेतनाचे 50% | लागू नाही |
10–24.9 वर्ष | निश्चित रक्कम | ₹10,000 महिना |
फॅमिली पेंशन (60%)
मृत्यूनंतर जोडीदारास अंतिम पेंशनच्या 60% रकमेइतकी मासिक कौटुंबिक पेंशन मिळते.
अर्ज कसा करावा?
Online:
- e-NPS पोर्टल वर लॉगइन
- PRAN, सेवा व वैयक्तिक तपशील भरणे
Offline:
- Form A2 भरून नोडल कार्यालयात सादर करणे
- आवश्यक कागदपत्रे: ओळखपत्रे, सेवा प्रमाणपत्र
महत्त्वाच्या सूचना:
- अर्ज वेळेत पूर्ण करा-अंतिम दिवशी सिस्टिम त्रुटी शक्य
- माहिती अचूक द्या-सेवा वर्षे व पगार चुकीचा भरल्यास पेंशन अडचणीत येऊ शकते
- कुटुंबीयांना प्रक्रियेची माहिती द्या
डिस्क्लेमर:
ही माहिती 24 जानेवारी 2025 च्या आर्थिक सेवा विभागाच्या अधिसूचनेवर आधारित आहे. अंतिम निर्णय घेताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.