आज आपण अशा एका महत्वाच्या योजनेबाबत माहिती घेणार आहोत, जी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आता ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून तब्बल 3 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, अर्ज कोठे आणि कसा करायचा, तसेच पात्रता अटी काय आहेत याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
ट्रॅक्टर अनुदान योजना – संपूर्ण माहिती
राज्य सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या आर्थिक मदतीच्या योजना राबवत असते. या योजनेत आधीपासूनच सौर पंप योजना, पीएम सूर्य घर योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे. मात्र, आता सरकारकडून ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांसाठी केवळ शेतीसाठीच नव्हे, तर उत्पन्नाचा स्त्रोतही ठरू शकते. मात्र ट्रॅक्टर खरेदीची किंमत जास्त असल्यामुळे अनेकांना ते परवडत नाही. हे लक्षात घेता सरकारकडून ही अनुदान योजना 2025 मध्ये राबवली जात आहे.
योजनेची वैशिष्ट्ये व लाभ
ही योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील स्वयंसहायता बचत गटांसाठी राबवली जात आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही मदत दिली जात असून, शेतीशी संबंधित साधनसामग्री खरेदीसाठी भरघोस आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
या योजनेतून गटांना 9 ते 18 HP क्षमतेचे मिनी ट्रॅक्टर, तसेच कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर आणि ट्रेलर सारखी उपसाधने खरेदी करता येणार आहेत. एकूण साधनांची किंमत 3.50 लाख रुपये पर्यंत असेल, त्यापैकी 3.15 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान सरकारकडून दिले जाणार आहे. उर्वरित 35,000 रुपये गटाने स्वतः भरायचे असतील. सरकारकडून यासाठी 90% अनुदान दिले जाईल.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार गट हा महाराष्ट्रात नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट असावा.
- अध्यक्ष, सचिव आणि 80% सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत गट नोंदणी प्रमाणपत्र, सदस्य यादी, सर्व सदस्यांचे जात प्रमाणपत्र, बँक खात्याचे तपशील, तसेच खरेदी करावयाच्या ट्रॅक्टर व साधनांचा अंदाजित खर्च सादर करावा लागेल.
- गटाने शेतीशी संबंधित प्रत्यक्ष काम करत असणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे. इच्छुक गटांनी या तारखेच्या आत अर्ज सादर करावा व या अनुदानाचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा:
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक-पुणे रोड, नाशिक.
कार्यालयीन वेळेत अधिकृत माहिती उपलब्ध आहे.